
Maharashtra Politics : ‘राज्यातील कारागृहात तीन वर्षांत पाचशे कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यातील प्रमुख असणारे तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरे याच्यासोबत सुपेकर यांचे घनिष्ठ संबंध असल्याने मुख्यमंत्री कारागृह घोटाळ्यावर पांघरूण घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज केला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.