
अजित पवार गटातील माजी खासदारांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.
esakal
Sangli Sanjay Kaka Patil : नौटंकी करणे माझ्या रक्तात नाही. ज्या शेतकऱ्यांनी शक्ती दिली, मला वाढवले, तो शेतकरी अडचणीत असताना मी गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवणार,’’ अशी घोषणा माजी खासदार संजय पाटील यांनी आज येथे रास्ता रोको आंदोलनावेळी केली. ते आंदोलकांसमोर बोलत होते. आंदोलनामुळे शहर दोन तास थांबल्याची स्थिती होती.