

Ichalkaranji Crime
esakal
Former Sarpanch Attacked : जंगमवाडी (ता. हातकणंगले) येथे गावातील गटारीचे काम केले नसल्याच्या कारणावरून माजी सरपंच सरिता मोरे यांच्या घरात घुसून तिघांनी त्यांना व त्यांच्या ७६ वर्षीय सासऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री घडली. या हल्ल्यात सासरे संभाजी मोरे यांच्या डाव्या खांद्यावर व डोळ्याजवळ लोखंडी गजाने मार लागून ते जखमी झाले. तसेच सरिता मोरे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रामचंद्र खोत, प्रशांत खोत आणि प्रतीक खोत (तिघे रा. जंगमवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.