कोवाडच्या एटीएममधून पळवलेली रक्कम रस्त्यातच पडल्याचे संशयित सुरुवातीला सांगत होते. चौघांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून केलेल्या चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली.
कोल्हापूर : कोवाड (ता. चंदगड) येथील राष्ट्रीयीकृत बॅंकेचे (National Bank) एटीएम मशीन (ATM Machine) गॅस कटरने फोडून १८ लाख ७७ हजारांची रोकड पळविलेल्या चौघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने आज (ता. १५) अटक केली. ५ जानेवारीला घडलेल्या प्रकारानंतर चौघे पसार झाले होते. चौघांना पालघर जिल्ह्यातील मनोर गावात असलेल्या सहारा मेवात धाब्यावरून ताब्यात घेतले होते.