

चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट परिसरातील धनगरवाडीतील ग्रामस्थांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले.
esakal
Chiplun Tiger Spotted : चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट परिसरातील धनगरवाडीतील ग्रामस्थांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चौथ्या वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होण्यास पुष्टी मिळाली आहे. या पट्ट्यात चौथा वाघ असल्याचे वनविभागाकडूनही यापूर्वीच मान्य करण्यात आले आहे.