
कोल्हापूर: फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताने पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना पाचगावच्या रायगड कॉलनीत घडली. महेश विलास ताडे (वय ३४) असे त्याचे नाव आहे. जखमी अवस्थेत बुधवारी रात्री त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर वडूज (जि. सातारा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.