
कोल्हापूर: शुभेच्छांच्या वर्षावात मैत्रीचा धागा घट्ट करत फ्रेंडशिप डे शहर परिसरात आज उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयीन तरुणाईने पर्यटनस्थळांना भेट देत आजच्या दिवसाच्या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या, तर व्हॉटस-अपचे स्टेटस फ्रेंडशिप डेच्या कलरफूल संदेशांनी सजविले.