आईच्या कष्टाचं पोरानं केलं चीज; स्पर्धा परीक्षेत सुनीलची भरारी

आई वैजयंता यांनी वीटभट्टीवर काम करून त्यांचा सांभाळ केला.
sunil patil
sunil patilesakal
Summary

आई वैजयंता यांनी वीटभट्टीवर काम करून त्यांचा सांभाळ केला.

कोल्हापूर : प्रा. सुनील बाळासाहेब पाटील तिसरीला असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. आईने वीटभट्टीवर काम करून शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित केले. 'कमवा व शिका' योजनेतून त्यांनी शिक्षण घेताना परिस्थितीची जाणीव ठेवली. विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी मिळवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेतून त्याची 'रासायनिक विश्लेषक' पदावर नियुक्ती झाली आणि संघर्षातून शिक्षण कसे घ्यावे, याची प्रचितीच त्यांनी दिली.

प्रा. पाटील यांनी २०१८-१९ला परीक्षा दिली होती. त्याचा निकाल डिसेंबर २०१९ ला जाहीर झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे नियुक्तीपत्र आले नव्हते. ते १८ मार्च २०२२ला त्यांना मिळाले. ते २१ मार्च २०२२ पासून सेवेत रुजू झाले. ते मूळचे इचलकरंजीच्या विठ्ठलनगर परिसरातील. ते लहान असताना वडीलांचे निधन झाले. आई वैजयंता यांनी वीटभट्टीवर काम करून त्यांचा सांभाळ केला. काही काळ त्यांनीही वीटभट्टीवर काम केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण परनाळ (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील मराठी मुलांची शाळा, माध्यमिक अर्जुननगर (निपाणी) मोहनलाल दोशी विद्यालय, तर उच्च माध्यमिक शिक्षण देवचंद महाविद्यालयातून झाले.

sunil patil
'राम मंदिराला विरोध करणाऱ्यांकडून अहिल्यादेवींच्या स्मारकाचे लोकार्पण नाहीच'

वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयातून बी.एस्सी भाग एक व दोनचे शिक्षण घेऊन मलकापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून विशेष प्राविण्यासह पदवी मिळवली. त्यांचा शिवाजी विद्यापीठाने विशेष प्राविण्य पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानंतर त्यांनी डॉ. अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनात कमवा आणि शिका योजनेत सहभागी होऊन असेंद्रिय रसायनशास्त्र यविषयातील पदव्युत्तर पदवी मिळवली. संगणकशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, आरोग्य पर्यावरण व औद्योगिक सुरक्षा यविषयातील पदव्युत्तर पदाविका विशेष प्राविण्यासह त्यांनी मिळवल्या.

सध्या रसायनशास्त्र विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी त्यांचे संशोधन सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांनी कागलमधील डी. आर. माने महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतनमधील धातू तंत्र प्रबोधिनी, शहाजी छत्रपती महाविद्यालय, गडहिंग्लजमधील डॉ. घाळी महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विषयात अध्यापनही केले.

sunil patil
प्रतिपंढरपूर नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावरून वाद

"काम कोणतेही असो ते मी प्रामाणिकपणे केले. माझी आर्थिक कुवत मजबूत नव्हती. कमवा व शिका योजनेतून शिक्षण पूर्ण करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षावर लक्ष केंद्रित केले. या परीक्षेतून पैसे न देता नोकरी मिळू शकते, याची जाणीव पक्की होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास केला."

- प्रा. सुनील पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com