मद्य वाहतुकीसाठी वाहन रचनेत बदलाचा फंडा

मद्य वाहतुकीसाठी वाहन रचनेत बदलाचा फंडा
Updated on

कोल्हापूर ः वाहनांच्या रचेनत बदल करून चोर तयार कप्पे करायचे. दर्शनी रिकाम्या दिसणाऱ्या वाहनातून मद्याची बेकायदेशीरीत्या वाहतूक करायची नवी पद्धत तस्करांकडून सुरू आहे, अशा तस्करांवर अंकुश घालण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागाला पेलावे लागत आहे. 
गोवा राज्यातून मद्याच्या चोरट्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व त्याची भरारी पथके लक्ष ठेवून असते. सीमा भागात विभागाची गस्त व नाकाबंदी असते. त्यातूनही नवे फंडे वापरून मद्याची चोरटी वाहतूक करणारी तस्करांची यंत्रणा वारंवार डोके वर काढते. मद्य तस्कर वाहतुकीसाठी वाहनांच्या रचनेत बदल करतात. त्यात चोर कप्पे तयार करून त्यात मद्याचे मोठ्या प्रमाणावर बॉक्‍स बसतील, अशी जागा तयार करून त्याआधारे आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू लागलेत. अशा तस्करांचा शोध घेऊन त्यांचा वेळीच पर्दाफाश करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांकडून सुरू आहे. वरवर पाहता रिकामे वाटणारे वाहनातून छुप्या पद्धतीने होणाऱ्या मद्याची वाहतूक विभागाने कारवाईतून हाणून पाडण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. 
हातकणंगले, इचलकरंजी या कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असणाऱ्या भागात बनावटरीत्या तयार केलेल्या मद्याचेही गुन्हे विभागाने उघडकीस आणले. यात विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्याचा वापर करून त्यात हुबेहुब बनावट मद्य भरून त्याची विक्री करणाऱ्यांचे प्रकार पुढे आणले. यात स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, वाहने जप्त करण्याचीही कारवाई केली. 

मद्य तस्करीसाठी नवे फंडे 
चारचाकी वाहनांच्या दरवाजांना चोर कप्पे करणे 
वाहनांच्या तळात स्वतंत्र कप्पा करणे 
स्टेफनीत मद्य लपविण्याची व्यवस्था करणे 
भाजीपाल्याचा क्रेडमध्ये मद्य लपवणे 

चौकट ः 
राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथकाची कामगिरी 
एप्रिल 2019 ते 10 ऑक्‍टोबर 2020 अखेर 
कारवाई अटक संख्या विदेशी मद्यसाठा बनावट मद्यसाठा वाहने जप्त एकूण मुद्देमाल जप्त 
45 68 11,443 लि. 621 लि. 37 1 कोटी 57 लाख 62 हजार

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com