
अजित माद्याळे
गडहिंग्लज : शहराची हद्दवाढ होऊन सहा वर्षे उलटली तरीसुद्धा अद्याप विकास आराखड्याला अंतिम मंजुरी नाही. त्यासाठी हा प्रस्ताव मंत्रालयाच्या लालफितीत पडून आहे. परिणामी, हद्दवाढीच्या विकासावर त्याचा परिणाम होत असून, नागरिक आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन बांधकामाची रेखांकने रखडल्याने नागरिकांची गोची झाली आहे.