Gadhinglaj Theft Case : ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; बंद बंगला फोडला, साडेपाच तोळे सोने, १५ तोळे चांदीचा समावेश
Jewelry Stolen : गडहिंग्लजमध्ये बंद बंगल्याला लक्ष्य करत चोरट्यांनी तब्बल ७ लाख १७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घर बंद असल्याचा फायदा घेत दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरी फोडली.
गडहिंग्लज : शहरातील वडरगे रोडवरील केडीसी कॉलनीमध्ये असलेला बंद बंगला फोडून अनोळखीनी सात लाख १७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले. त्यात साडेपाच तोळे सोने, तर १५ तोळे चांदीचा समावेश आहे.