

Burning Car Incident
sakal
गडहिंग्लज: शहरातील धबधबा मार्गावरून वडरगेला जाणाऱ्या रस्ता परिसरात ‘बर्निंग कार’चा थरार नागरिकांनी अनुभवला. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मोटारीचे दोन लाखांवर रकमेचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची पोलिसात मात्र नोंद झालेली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.