

Gadhinglaj Farmers Protest Drought Status Demand Road Blockade and Tyre Burning After Government Decision Sparks Anger
sakal
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांत समावेश न केल्याने २० दिवसांपासून शांततेत सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत दसरा चौकात टायर्स पेटविल्या, वाहतूक अडवली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिस ठाण्यातही त्यांनी ठिय्या मारल्याने दिवसभर तणाव होता. दुष्काळी तालुक्यांत गडहिंग्लजचा समावेश करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होती. यात सकारात्मक निर्णय होईल, अशी चर्चा होती. आंदोलनस्थळीही तसेच वातावरण होते.