

Gadhinglaj Election Result Tension
sakal
गडहिंग्लज : येथील नगरपरिषद निवडणूक निकालानंतर सायंकाळच्या सुमारास प्रभाग सहामध्ये गुणे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. एकाला मारहाण, तर एका बंद दुकानाच्या शटरवर दगड टाकले. तसेच विजयी उमेदवाराचा डिजिटल फलकही फाडल्याचा प्रकार घडला. अशा विविध घटनांनी हा तणाव निर्माण झाला.