esakal | "या' शहरात यंदा गतवर्षीपेक्षा 50 टक्के अधिक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj Has Installed 50 Percent More Eco Friendly Ganesh Idols This year Than Last Year Kolhapur Marathi News

गेल्या दोन दशकात अधिक उंचीच्या मुर्तीचा आग्रह आणि मुर्तीकामाचे व्यावसायिकरण यामुळे प्लास्टर मुर्तीचे प्रमाण वाढले.

"या' शहरात यंदा गतवर्षीपेक्षा 50 टक्के अधिक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : गणेशोत्सव म्हणजे आनंदपर्व. परंतु, या आनंदपर्वात अलिकडे अनावश्‍यक बाबींमुळे वाढणारे प्रदुषण चिंतेचा विषय ठरत आहे. यंदा मात्र घातक प्लास्टरला फाटा देत शहर परिसरात 1200 हून अधिक शाडूच्या घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या वर्षी ही संख्या 800 होती. तुलनेत ही संख्या 50 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी देखील यात सातत्य ठेवले आहे. सततच्या प्रबोधनामुळे शाडू मुर्तीची वाढलेली संख्या ही पर्यावरणपुरक आनंदपर्वासाठी जागरुकता वाढल्याचेच द्योतक आहे. 

गेल्या दोन दशकात अधिक उंचीच्या मुर्तीचा आग्रह आणि मुर्तीकामाचे व्यावसायिकरण यामुळे प्लास्टर मुर्तीचे प्रमाण वाढले. साहजिकच मागणी तसा पुरवठा म्हणून मुर्तीकारांनी देखील कमी वेळेत जास्त उत्पन्न देणाऱ्या प्लास्टरला प्राधान्य दिले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणपुरक शाडू मुर्ती कला दृष्टचक्रात सापडली. 

प्लास्टर पाण्यात विळघळत नाही. तसेच यावर कृत्रिम रंग वापरावा लागत असल्याने त्याचाही पाणी प्रदुषणाला हातभार लागतो. यामुळेच शाडूच्या मुर्ती पर्यावरणपुरक असल्याने पुन्हा ग्राहक त्याकडे वळत असल्याचे मुर्तीकार किरण कुंभार यांनी सांगितले. येथील कुंभारवाड्यात सुमारे पन्नास कुटुबींयाकडून पाच हजार गणेशमुर्त्या बनविल्या जातात.

दरवर्षी आठशे शेडूच्या मुर्त्या मागणीनुसार केल्या जायच्या. यावर्षी भर पडून ही संख्या 1200 हुन अधिक झाली आहे. यंदा विशेष म्हणजे कुंभार समाजातील तिसऱ्या पिढीच्या काहीं नवोदित कलाकारांनीही शाडू मुर्त्या घडविल्या. घरगुती मर्यादीत असणाऱ्या शाडूच्या मुर्ती परंपरेत दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी असतात.

गणेशोत्सवात विधायक ओळख निर्माण करणाऱ्या नेहरु चौकातील युनिव्हर्सल फ्रेंडस सर्कल स्थापनेपासून गेली दोन दशके शाडूच्या मुर्तीचा गजर कायम ठेवला आहे. मांगलेवाडीतील साई गणेशोत्सव मंडळही कायमच शाडूच्या मुर्तीला प्राधान्य देत आले आहे. 

जागरूकतेमुळे शाडू मुर्तीसाठी आग्रह
शाडूच्या मुर्ती पर्यावरणपुरक आहेत. परंतु, या मुर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने मुर्तीकारांनी देखील याकडे पाठ फिरवली होती. पर्यावरणाबाबतच्या जागरूकतेमुळे ग्राहक शाडू मुर्तीसाठी आग्रह धरू लागले आहेत. त्यामुळे यंदा शाडूच्या मुर्त्यांची संख्या वाढली आहे. 
- यशवंत कुंभार, ज्येष्ठ मुर्तीकार, गडहिंग्लज

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

loading image
go to top