गडहिंग्लज : येथील नगरपरिषद निवडणुकीची लढत नेहमी जनता दल विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होते. यावेळी मात्र जनता दलासोबत भाजप, जनसुराज्य व शिंदे शिवसेना असल्याने रंगत आली आहे..त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे व चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा पालिकेवर आपलाच झेंडा फडकावण्यासाठी कस लागला आहे. .Kolhapur Politics : बालेकिल्ल्यातच मुश्रीफांना घेरण्याचा भाजपचा डाव; मुरगूड-गडहिंग्लजमध्ये दिग्गज नेत्यांची एन्ट्री, राजकीय वातावरण तापलं.या सर्वांनी प्रतिष्ठाही पणाला लावली आहे. परिणामी, आजपर्यंत वेशीबाहेर न गेलेली येथील निवडणूक यंदा जिल्ह्यासह राज्य पातळीवर चर्चेत आली आहे. पालिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या जनता दलाने यावेळी नवा डाव खेळला. .राज्य, केंद्रात सत्ता नसलेला जनता दल शहराचा विकास कसा साधणार, अशी विरोधकांकडून होणाऱ्या नेहमीच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पक्षाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी यावेळी राज्याच्या सरकारमधील भाजप, जनसुराज्य व शिंदे शिवसेनेशी गट्टी जमविली. .Kolhapur Election: भाजप-शिंदे सेना एकत्र, दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र! मुरगूडमध्ये रंगणार दुरंगी लढाई. .या महायुतीद्वारे त्यांनी मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. यामुळे राष्ट्रवादी येथे एकाकी आहे. या पार्श्वभूमीवर माघारीनंतरच्या चार दिवसांतच मुश्रीफ यांचे गडहिंग्लजचे तीन दौरे झाले..पहिल्यांदा प्रमुखांच्या गाठी भेटी, दुसऱ्यावेळी कोपरा सभा आणि आज तिसऱ्यांदा मुश्रीफ गडहिंग्लजमध्ये होते. दुसऱ्या बाजूने, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची पहिली फेरी झाली. खासदार महाडिक, आमदार पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम या तिघांचीही प्रत्येकी एक फेरी झाली आहे. .पालकमंत्री आबिटकर आणि जनसुराज्यचे संस्थापक आमदार कोरे यांच्या दौऱ्याचेही दोन दिवसांत नियोजन असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, राज्याच्या सत्तेतील महायुतीचे घटक पक्ष एकमेकासमोर उभे ठाकले आहेत..मंत्री पाटील व मुश्रीफ दोघांनी एकमेकांच्या विरोधात काहीशी राजकीय ‘कळ’ काढली आहे. परंतु, वरिष्ठांच्या आदेशानुसार अजून तरी एकमेकांवर टोकाचे आरोप झालेले नाहीत. दोन दिवसांत होणाऱ्या जाहीर सभांमध्ये हा नियम पाळला जातो की नाही, यावर एकमेकांचे लक्ष राहणारच आहे..राष्ट्रवादीविरोधात चार पक्षांनी सांघिकपणे रिंगणात उतरल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. शिवाय, या सर्व मंत्री, खासदार, आमदारांची प्रतिष्ठाही तितकीच पणाला लागली आहे..नेते ठाण मांडणार...आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांनी कोपरा सभा, संपर्क मोहिमेद्वारे मतदारांच्या भेटीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. महायुतीतर्फेही काही नेत्यांनी भेटीगाठी व कोपरा सभेद्वारे मतदारांना संबोधित केले. अंतिम टप्प्यात जाहीर सभांसह दोन्हीकडील काही नेते येथे ठाण मांडण्याची शक्यता आहे. .तसेच, महायुतीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी ताकद लावली जात असून, त्या माध्यमातून भाजपकडून मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.