

अजित माद्याळे :
गडहिंग्लज : उसाला लागणारी हुमणी, मिळणारा दर आणि कारखान्याला पाठवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीला कंटाळलेले ऊस उत्पादक तंबाखू पिकाकडे वळले आहेत. विशेष करून हिरण्यकेशी नदीकाठावरील ऊस पट्ट्याच्या दहा गावांमध्ये तंबाखूचे पीक घेण्याचा कल वाढत आहे.