Ethanol Tanker Fire : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर 40 हजार लिटर इथेनॉल भरलेला टँकर पेटला; टायर, केबिन जळून खाक

Ethanol Tanker Catches Fire Near Gaganbawda : गगनबावड्याजवळ टायर फुटल्याने इथेनॉल टँकरला आग लागली. दरम्यान, अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे.
Ethanol Tanker Fire Accident on Kolhapur–Goa Highway

Ethanol Tanker Fire Accident on Kolhapur–Goa Highway

esakal

Updated on

गगनबावडा : इथेनॉल घेऊन कागलहून गोव्याकडे निघालेल्या टॅंकरचा टायर फुटून लागलेल्या आगीत टायर, केबिन जळून टँकरचे मोठे नुकसान झाले. काल (मंगळवार) दुपारी चारच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा या प्रमुख मार्गावरील मार्गेवाडीजवळ (Ethanol Tanker Fire Accident on Kolhapur–Goa Highway) ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या (Gaganbawda Accident) तीन गाड्या उपलब्ध झाल्याने आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com