esakal | पश्चिम केनियात आरतीला चंदगडी स्वरसाज
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम केनियात गणपती आरतीला चंदगडी स्वरसाज

पश्चिम केनियात गणपती आरतीला चंदगडी स्वरसाज

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड: पश्चिम केनियातील एल्डोरेट शहरांमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक नियम केले आहेत. दररोज ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतात. अन्य भक्त झूम अॅपवर ऑनलाईन सहभागी होतात. कार्यक्रमात दररोजची गणेशाची आरती म्हणण्याचा मान केनियास्थित म्हाळेवाडी (ता. चंदगड) सुधीर पाटील यांना मिळाला आहे. चंदगडी आवाजातील मराठी आरतीने या उत्सवाची रंगत वाढली आहे.

हेही वाचा: बेळगाव: दुचाकी चोरट्याच्या बेळगाव पोलीसांनी मुसक्या आवढल्या

एल्डोरेटमधील श्रीराम मंदिरात १९३४ पासून गणेश चतुर्थीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापित करून उत्सव साजरा केला जातो. गणेशाची ही मूर्ती भारतातून मागवली जाते. अलीकडे काही स्थानिक कलाकारही मूर्ती बनवत आहेत. दरम्यान कोरोनामुळे यावर्षी गर्दीला मर्यादा आल्या आहेत. दररोज यजमान दहा कुटुंबांना सहभागी होण्याची परवानगी मिळते. तेथे अभिषेक, भजन व आरतीचे विधी झूम अॅपवरून प्रसारित केले जातात.

या कार्यक्रमात अन्य भाविक ऑनलाईन सहभागी होतात. जयकारा आणि फळ स्वरूपात प्रसाद वाटला जातो. या शहरात गुजराती नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र बहुतेकांच्या पत्नी गुजराती असल्या तरी मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या असल्यामुळे त्यांना मराठी आरती आवडते असे सुधीर पाटील यांनी सांगितले. गावापासून शेकडो मैल दूर गणेशोत्सवाचा सण साजरा करताना, त्यातही मराठीतून आरती गायन करताना ऊर अभिमानाने भरून येतो असे त्यांनी सांगितले.

८७ वर्षांची परंपरा

केनियाची राजधानी नैरोबीमध्ये ८७ वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. नोकरी-व्यवसायानिमित्ताने तेथे स्थायिक झालेले पंजाबी, शहा, ब्राह्मण, पटेल आदी लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. अलीकडे महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. पारंपारिक गाणी, झिम्मा, फुगडी आदींच्या माध्यमातून या उत्सवाची रंगत वाढवली जाते.

loading image
go to top