
कोल्हापूर : विचित्र हेअरस्टाईल, डोळ्यांवर गॉगल, हातात नॅपकिन, वाढवलेली शेंडी, पायात ब्रॅन्डेड स्लिपर घालून शाळा-महाविद्यालयांच्या आवारात ‘टोळक्यांचा’ वावर वाढला आहे. महाविद्यालयाशी संबंध नसणारे ‘रोडरोमिओ’ दिवसभर घुटमळताना नजरेस पडले. पोलिस किंवा निर्भया पथकाचे वाहन येताच गल्लीबोळात लपून पुन्हा गर्दी करू लागले आहेत. शहरातील बहुतांश महाविद्यालयांबाहेर हेच चित्र दिसून येत होते.