MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या
ST Depot : गारगोटी आगाराने आदमापूर यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या गर्दीतही शिस्तबद्ध नियोजन, अतिरिक्त फेऱ्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे केवळ सेवा नव्हे तर तब्बल १८ लाखांहून अधिक उत्पन्नाची विक्रमी कामगिरी साध्य झाली.
गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील लाखो भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या संत बाळूमामा यांच्या भंडारा उत्सव व अमावस्येनिमित्त आदमापूर येथे दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी ‘लालपरी’ अक्षरशः धावली.