इचलकरंजी : पवन हॉटेल खंडणीप्रकरणी (Pawan Hotel Extortion Case) सातव्या मोका कारवाईतील मुख्य आरोपी आणि कुख्यात जर्मनी गँगचा (Germany Gang) टोळीप्रमुख आनंदा शेखर जाधव ऊर्फ आंद्या जर्मनी (वय २७, कबनूर, ता. हातकणंगले) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला मोका न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी कडक बंदोबस्तात हॉटेल पवन परिसरात तपासासाठी फिरवले.