
कोल्हापूर : कोरोनाचं संकंट जगभर आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा आकडयामुळे थरकाप होत आहे. अशा वेळी कोरोना विरूद्ध लढाईसाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या संकटकाळी रस्त्यावर अंतर ठेवा म्हणून संदेश दिले जात आहेत. पण या लॉकडाउनने मात्र अनेक कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणले. इतकेच नाही तर अनेक वर्षे एकमेकापासून दूर असलेले काही मित्र सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र आले. देश आणि परदेशात असलेल्या या शाळकरी मित्रांनी कोरोनापासबन बचाव करताना धीर सोडू नका लॉक डाउनची "ही वेळही निघून जाईल..' आणि पुन्हा चांगले दिवस येतील, असा संदेश देण्यासाठी या मित्रांनी एक व्हिडीओ गीत तयार केले.
युही कट जायेगा सफर साथ चलनेसे... असा लॉक डाउनचा संदेश देणाऱ्या या गीताचे चित्रीकरण म्हणजे अगदी कोल्हूार, कागलपासून ते मुंबई, पुणे,बंगळूर व अमेरिका अशा ठिकाणी कार्यरत असेलेल्या मित्रांच्या कुटुंबातील लोकांनी मोबाईलवर शुटींग केले आहे.
हे सर्व मित्र लॉकडऊनमध्ये सुरक्षीत आहेत. आणि"अिापल्या घरात सुरक्षित रहा असा' संदेश देणारे हे गीत पाहताना आणि ऐकताना मिळणारा स्फुर्तीदायक संदेश दिला आहे.
1993 मध्ये आलेल्या "हम है राही प्यार के' या चित्रपटातील हे गीत आहे. "युहीं कट जायेगा सफर साथ चलनेसे... मंझिल आयेगी नजर साथ चलनेसे...' या गीतावर कोल्हापुरातील स.म. लोहिया हायस्कुलमधून 1991 मध्ये बाहेर पडेलेल्या या शाळकरी मित्रांनी घरात घरकाम करताना या गाण्याचा वापर करत व्हिडिओ तयार केला आहे. यात नवरा बायकोच्या घरकामाची वाटणी केलेली नाही, तसेच एकत्रीत कुटुुंबाचाही संदेश आहे. मुळचे कोल्हापुरचे फुटबॉल खेळाडू आणि कोच असेलेल्या अमरदीप कुंडले यांच्या संकल्पनेतून हा व्हिडीओ तयार झाला आहे.
कोल्हापूरचे रितेश मोरे, गौरी घोलकर, गिरीश बारटके, अनुपमा पाटील, किरण निंबाळकर, अमेरिकेतील महेंद्र दळवी, पुणे येथील प्रसन्न देशपांडे, निशा घाटपांडे, वर्षा प्रकाश महाबळेश्वरकर, समीर जोशी, सचिन हावलदार, रश्मी महाजनी तसेच बंगळूरूच्या प्राध्यापक रोहिणी गद्रे, माजी सैनिक जयसिंगराव हवालदार यांनी यात सहभाग घेतला आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत राजलक्ष्मी आणि सरस्वती बारटक्के, आरूष दळवी, मैत्रयी देशपांडे, आर्यन हवालदार या बालकांनीही या गीतात सहभाग घेतला आहे.
लॉक डाऊनच्या परिस्थितीत प्रत्येकाला कंटाळा आला आहे. घरात बसून मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी थोडीशी स्फूर्ती देणारे गाणे वेगळ्या रूपात कानावर पडावे. कोरोना आणि लॉकडाऊन यातून बाहेर पडणे सोपे आहे. ही भावना पेरण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला आहे.
अमरदिप कुंडले, फुटबॉल कोच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.