Video -तुमच्या शहराच घारींचे प्रमाण जास्त असेल तर ही बातमी वाचा

Ghar bird special story in marathi
Ghar bird special story in marathi
Updated on

कोल्हापूर : तीक्ष्ण डोळे अन्‌ आकाशात उंचावर घिरट्या घालत एका क्षणात जमिनीवर येऊन भक्ष्यांवर हल्ला करुन ती उचलून नेणारी ही घार जयंती नालाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तवास आहे. घार हा पक्षी जरी असला तरी तो मोठ्या प्रमाणात शहरात दिसणे हे चांगले लक्षण नव्हे. तुम्ही म्हणाला, ती दिसायला सुंदर आहे. ससाण्यासारखी ती शिळ घालते. उंच आकाशात उडते. हे खरे; पण जिथे सेंद्रीय पदार्थ, अन्य कचरा, कोंडाळे, सांडपाण्याची गटारे जिथे सर्वाधिक आहेत, तिथे घार सर्वाधिक दिसते. म्हणजे, शहरात सेंद्रीय पदार्थांचे सर्वाधिक प्रदुषण वाढले की, ते सांगण्यासाठी घारींचे प्रचंड मोठे थवे आकाशात फिरत असतात. हे उत्तम शहराचे लक्षण नव्हे. 

आता तर लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत. सांडपाणी दररोज जयंती नाल्याला येऊन मिळत असते. या सांडपाण्यातून अन्नपदार्थांचे कण, मटणाचे तुकडे, अन्य पदार्थ येऊन मिसळतात. नंतर हा कचरा सांडपाण्याद्वारे जयंती नाल्याला येतो. यासाठी कावळ्यांबरोबर घारही जयंती नाला परिसरात सर्वाधिक दिसत आहे. घार ही मानवी सहवासात राहते. दाट वस्तीची शहरे, गावात ती दिसते. ती खूप धीट असून जराही घाबरत नाही. कावळ्याप्रमाणे मनुष्य वस्तीतील घाण नाहीशी करण्याच्या कामी तिची मदत होते. ही घार खूप काळ आकाशात बऱ्याच उंचीवर उडत असते. पंख पसरून तरंगत राहते. ती उंच जाते. खाली येते. वळते घेते. आकाशात असताना तिची तीक्ष्ण दृष्टी जमिनीकडे असते. एखादा बेडूक, साप, सरडा, कोंबडीचे पिलू किंवा उंदीर जमिनीवर दिसला की, ती वेगाने खाली येऊन झेप घेऊन भक्ष्यावर झडप घालते. तीक्ष्ण नखांनी पकडते. झाडावर नेते. चोचीने भक्ष्याला ठार करते. लचके तोडून खाते. गांडूळ, अन्य कीटक ही ती खाते. खाण्यायोग्य कोणताही पदार्थ ती खाते. 

घारीचा रंग तपकीरी असून अंगावर भरपूर पिसे असतात. साधी घार, ब्राम्हणी घार, काळी अथवा कापशी घार असे प्रकार आहेत. कोल्हापूर परिसरात हे सर्व प्रकार दिसतात. घारीची शेपटी दुभंगलेली असते. त्यामुळे उडत असताना घार सहजपणे ओळखता येते. जयंती अन्‌ गोमती अशा दोन नद्या या कात्यायनी डोंगर कपारीतून बाहेर पडतात. नंतर या दोन नद्या शहर परिसरातून पंचगंगेला जाऊन मिळतात. खरेतर या खूप वर्षांपूर्वी नद्या होत्या; पण जशी लोकसंख्या वाढू लागली. घरे झाली. घनकचरा जास्त होऊ लागला. सांडपाणी निर्माण होऊ लागले. तसे जयंती अन्‌ गोमती नद्या या सांडपाण्यात रुपांतरीत झाल्या. जयंती अन्‌ गोमती ही हुतात्मा पार्क गार्डनमध्ये एकत्रित येतात. जयंती नाल्यामध्ये बेडूक, मासे, सरडे, चिकट-मटणाचे फेकलेले तुकडे किंवा अन्नपदार्थातून आलेले तुकडे, कोणतीही पक्ष्यांची पिल्ले, उंदीर, किडे, किटक ही घार खाते. दुसरे असे की, कोणताही मृत प्राणी जयंती नाल्यातून आणून टाकतात. अगदी मटण, चिकनचा कचराही काहीजण आणून टाकतात. 


ब्राह्मणी घार अन्‌ साधी घार 

ब्राह्मणी घार ही नद्या, झरे, तलाव आदी परिसरात असते तर साधी घार ही कचरा कोंडाळा, सांडपाणी, झुम प्रकल्प आदी ठिकाणे सर्वाधिक दिसते. 

"घारीला स्कॅव्हेंजर असे म्हणतात. कोल्हापूर शहरात दिसणाऱ्या या घारी जिथे सर्वाधिक कचरा आढळतो, त्या परिसरात दिसतात. म्हणजे, जयंती नाला आणि झुम प्रकल्प येथे. उंदीर, घुशी, अन्य मृत पक्षी, मटणाचे तुकडे जिथे सर्वाधिक सापडतात, तिथे या घारी ते खाण्यासाठी त्या परिसरात सर्वाधिक आढळतात. शेजारी असणाऱ्या झाडांवर त्या बसतात. आकाशात घिरट्या घालतात.'' 

- सुहास वायंगणकर, पक्षीतज्ज्ञ


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com