विनयनगर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी ॲकॅडमीच्या ११ एकर जागेत चार लाख ५० हजार स्क्वेअर फुटांची शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे काढण्यात आली आहे.
वारणानगर : ‘छत्रपती शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) मातीवर साकारलेली पहिलीच रांगोळी आहे. मिर्झापूरनंतर वारणेत छत्रपतींची सर्वांत मोठी रांगोळी साकारली आहे. ऐतिहासिक पावनभूमीत रांगोळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवराय अवतरले असून, राजमाता जिजाऊंचा आदर्श महिलांनी डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी येथे केले.