पारंपारिक पिकाला फाटा देत इंजोळ्यात केली आले पिकाची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ginger crop cultivation in kolhapur panhala

 २०१९ सालच्या मे महिन्यात मशागत केलेल्या जमिनीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावण केली

पारंपारिक पिकाला फाटा देत इंजोळ्यात केली आले पिकाची लागवड

आपटी - पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या इंजोळे येथील प्रयोगशील शेतकरी मानसिंग पाटील यांनी ऊस, भात, नाचना, भुईमुग या पारंपारिक पिकांना फाटा देत कमी खर्चात जादा उत्पन्न देणाऱ्या आले पिकाची लागवड करून यशस्वी प्रयोग केला आहे. या प्रयोगातून  इतर नगदी पिकापेक्षा कमी कष्टात जास्त उत्पन्न कसे मिळवता येते याचे उदाहरणच पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना पटवून दिले आहे.


पन्हाळ गडाच्या पायथ्याचा पूर्व पश्चिम बांधारी परिसर तसा डोंगरउताराचाच. येथील शेतीही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली तशी कोरडवाहूच. त्यामुळे येथील बहुतांशी जमिनीत भात, नाचना, भुईमुग हीच पारंपारिक पिके घेतली जातात. तर काही शेतकऱ्यांनी विहीर कुपनलिका याच्या माध्यमातून बागायत शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या जमिनीत ऊसाचे उत्पन्न घेतले जाते. भात, नाचना, भुईमुग ही पिके उसापेक्षा कमी कालावधीत येत असली. तरी या पिकांना कष्टाच्या प्रमाणात नफा कमी मिळतो. या पिकांपेक्षा ऊसाला नफा जास्त मिळतो पण त्यासाठी खर्च ही जास्त करावा लागतो. तसेच ऊसाचा काढणीचा कालावधी ही जास्त आहे. तर मिळणाऱ्या दाराचीही शास्वती नसते. या सर्व अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या बळीराजाला पाटील यांच्या प्रयोगाने एक फायदेशीर मार्ग सापडला आहे. 

इंजोळे येथील मानसिंग पाटील हे  सुरवातीपासूनच शेतीकडे वळले. इंजोळे गावला ग्रासलेल्या शेतीसाठीच्या पाण्याची टंचाईवर मात करण्यासाठी व पिकाला वेळेवर पाणी मिळावे म्हणून पाटील यांनी बोअरवेल मारून सुमारे ६०० फुट पाईपलाईन टाकून पाण्याची सोय करून घेतली. शेती व्यवसाय करत असताना त्यातील नफातोटा पाहण्यास सुरवात केली व कमी कष्टात जास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत विचार करून त्यांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरवात केली. त्यांनी भात पिकाचे वेगवेगळे वान वापरून उत्पन्न वाढविण्याचे प्रयोग केले. त्यातूनच त्यांनी सन २०१८ साली २७ गुंठ्यात भाताचे ४७ पोती इतके विक्रमी उत्पन्न घेतले. पण आधुनिक शेतीचा  ध्यास घेतलेल्या पाटील यांचे एवढ्यावर समाधान झाले नाही. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले व नवनवीन पिकांची
माहिती घेण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांना “आले” पिकाविषयी मिळालेल्या माहितीने ते प्रभावित झाले. २४ गुंठ्यात तेथीलच एका कृषी सेवा केंद्राच्या मार्गदर्शना खाली आले पिकाची लावण केली. 

 २०१९ सालच्या मे महिन्यात मशागत केलेल्या जमिनीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावण केली. पाटील यांनी २४ गुंठ्यात लागवड केलेल्या आले पिकातून त्यांना अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

 आले पिकाचा कालावधी व खर्च
कालावधी - ११ महिने पुढे १८ महिन्या पर्यंत ही ठेऊ शकता
मशागत खर्च -प्रती गुंठा ७०० रुपये. 
बियाणे खर्च - ८० रुपये किलो प्रती गुंठा १२ ते १३ किलो बियाणे आवशक
औषधे व खते - प्रती गुंठा २५० रुपये खर्च होतो.
 अशाप्रकारे सर्वसाधारण एकत्रीत खर्च - प्रती गुंठा २१०० रुपये. 

हे पण वाचाकोल्हापूर - ट्रकच्या केबिनमधून ३३ लाखांची चोरी

जंगली जनावरांचा त्रास नाही

पन्हाळ्याच्या बांधारी परिसरात डोंगराळ व जंगली असल्याने येथील पिकांचे जंगली जनावरांकडून  मोठया प्रमाणात नुकसान केले जाते. पण आले हे तिखट असल्याने या पिकाला जनावरे खात नाहीत. त्यामुळे या पिकाचे जानावारांपासून नुकसान होत नाही. हा मोठा फायदा आहे.


शेतकरी बांधवांनी पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती करणे ही काळाची गरज आहे.
-मानसिंग राजाराम पाटील, प्रयोगशील शेतकरी इंजोळे

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top