
कोल्हापूर - बापाने कानशिलात लगावल्याने सहा वर्षाच्या मुलीचे डोके भिंतीवर अपटले. त्यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शाहूपुरी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी संशयित बाप तानाजी दिलीप मंगे (वय 29, रा. जयभवानी गल्ली) याला पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कसबा बावडा जयभवानी गल्लीत राहणाऱ्या तानाजी मंगे यांच्या कुटुंबातील सहा वर्षीय मुलगी अनन्याचा मृत्यू झाला. ती चक्कर येऊन पडून गंभीर जखमी झाली असे सांगण्यात आले. याबाबत विविध शंका व्यक्त केल्या जात होत्या. याचा तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक स्मिता पाटील, कर्मचारी तानाजी चौगले, राजू वरक यांनी तपासास सुरवात केली. अवघ्या तासाभरात त्यांनी बापानेच कानशिलात लगावल्याने मुलीच्या मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आणले.
पोलिसांनी संशयित वडील तानाजीला ताब्यात घेतले. त्याने घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथीत केला. तो कसबा बावडा जयभवानी गल्लीत कुटुंबासोबत दोन महिन्यापूर्वी राहतो. तो शुक्रवारी दुपारी पत्नी, मुलगी अनन्या (वय 6) बरोबर येथील दत्त मंदिरात गेला होता. दर्शन करून सर्वजण घरी परत आले. त्यानंतर अनन्या ही दारात खेळू लागली. तिला खेळताना तहान लागली. ती पाणी पिण्यासाठी घरात आली. पण वडीलांना (तानाजी) पाहून घाबरत घाबरत घरात निघाली. त्याचा तानाजीला राग आला. त्याने तिला कानशिलात लगावली. तशी ती भिंतीवर जोरात जाऊन आदळून खाली पडली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तानाजीने तिला परिसरातील खासगी व तेथून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच पोटच्या मुलीचा मृत्यू झाल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी तानाजी मंगेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला आज दोन दिवसाची कोठडी सुनावली.
आईचा आक्रोश...
पोटच्या मुलीचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याचे पाहून तिच्या आईने मोठा आक्रोश केला. तसेच ती पती (तानाजी) च्या अंगावर धावून गेली. तिला पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी रोखल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.