esakal | शेतीला दिवसा बारा तास वीज द्या! राजू शेट्टी यांची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Give agriculture twelve hours of electricity a day demand of Raju Shetty

गेल्या सोळा दिवसापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व उद्योगधंदे, व्यापार, कार्पोरेट कार्यालये, औद्योगिक वसाहती पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या शेतीला तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री असा वीज पुरवठा केला जात आहे. कडक उन्हाळा सुरु असल्याने शेतीपिकांना वेळेवर पाणी देण्याची गरज आहे.

शेतीला दिवसा बारा तास वीज द्या! राजू शेट्टी यांची मागणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय औद्योगिक वीजेचा वापरही बंद असल्याने शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा. सध्या शेतकरी लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात आहे. त्याला उभारी देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. 

गेल्या सोळा दिवसापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व उद्योगधंदे, व्यापार, कार्पोरेट कार्यालये, औद्योगिक वसाहती पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या शेतीला तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री असा वीज पुरवठा केला जात आहे. कडक उन्हाळा सुरु असल्याने शेतीपिकांना वेळेवर पाणी देण्याची गरज आहे. शेती पिकली तरच देशातील १३७ कोटी जनतेला अन्नधान्य मिळणार आहे. रात्री पाणी पाजविणे शेतकऱ्यांना जिकिरीचे होत असून लॉकडाऊनच्या काळात रात्रीचा वीज पुरवठा सुरु आहे. त्यामुळे सध्या वीजेची मोठ्या प्रमाणात बचत होत असून किमान याकाळात तरी शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा. जेणेकरुन लॉकडाऊनच्या काळात देशातील जनतेला चांगल्या प्रतीचा भाजीपाला मिळेलच शिवाय जनतेला अन्नधान्यही मिळेल. महापूराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेती आणि घरांचे पंचनामा करण्यात आले असले तरी अद्याप नुकसानग्रस्त शेतऱ्यांना मदत मिळाली नाही. 
असे असताना कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर भाजीपाला, द्राक्ष, फळे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करुन दिलासा द्यावा. लॉकडाऊनच्या काळात बचत झालेली वीज शेतऱ्यांयांना द्यावी. जेणेकरुन दिवसा शेतीला पाणी पाजताना सुरक्षित वाटेल अशीही मागणी श्री शेट्टी यांनी केली आहे. 

loading image