गडहिंग्लज : गोव्याहून दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क पथकाने (State Excise Squad) अटक केली. गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केलेल्या या कारवाईत वाहनासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, गोवा दारूच्या बाटलीवर हुबेहूब महाराष्ट्रातील स्पिरीट कंपनीचे (Spirit Company) लेबल लावणाऱ्या टोळीचाही पथकाने पर्दाफाश केला.