

Gokul Chairman Election
Esakal
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी समविचारी आघाडीचे १३ संचालक, महायुतीचे १२ आणि शासन नियुक्त ४ संचालक दाखल झाले आहेत. महायुतीचे संचालक फेटे बांधून गोकुळ दूध संघाच्या परिसरात दाखल झाले. तर शासन नियुक्त संचालक पोलिसांच्या बंदोबस्तात आले होते.