Shashikant Patil Chuyekar chairman election
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुरुवारी (ता. २९) मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. महायुतीचे संचालक अनुपस्थित असताना समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा केला (Gokul Chairman Election 2026) आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गणपूर्तीअभावी निवड प्रक्रिया पुढे नेण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर समविचारी आघाडीच्या संचालकांनी स्वतंत्रपणे ही प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.