
अन्य घोषणा
आता चार जनावरांसाठीही मुक्त गोठा योजनेचे अनुदान
संस्था इमारत अनुदान आणि दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहनातही वाढ
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आज म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ करून सभासदांना गणेशोत्सवाची भेट दिली. ही एक सप्टेंबरपासून वाढ लागू होणार असून विक्री दरात वाढ नाही. याशिवाय संस्था इमारत अनुदानात आणि दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे मुक्त गोठा अनुदान योजनेसाठी पाच ऐवजी चार जनावरांनाही लाभ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली.