Kolhapur Gokul : महायुतीविरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धार; ‘संघर्ष मोर्चा’ सोमवारी;‘गोकुळ’च्या सत्ता संघर्षावरून फुंकले रणशिंग

Gokul Dairy Protest: गोकुळ दूध संघातील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबरला संघर्ष मोर्चाची हाक दिली आहे. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार समविचारी पक्षांच्या बैठकीत करण्यात आला.
Opposition leaders prepare for a protest march against the government’s decision on Gokul Dairy in Kolhapur

Opposition leaders prepare for a protest march against the government’s decision on Gokul Dairy in Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : महायुतीच्या विरोधातील मोर्चात लाखोंचा सहभाग करण्याचा निर्धार आजच्या समविचारी आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी नऊ नोव्हेंबरला ‘संघर्ष मोर्चा’ची हाक दिली आहे. सकाळी दहा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.

मोर्चात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामुळे आता गोकुळच्या सत्ता संघर्षाची धग आता थेट रस्त्यावर पोहोचणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Protest March Gokul Milk Union Power Struggle
Gokul dairy latest update
Gokul Chairman Election satej patil statement
Gokul Milk Election Prakash Abitkar kolhapur