Inquiry on Gokul Dairy : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय पवार यांनी केलेल्या गैरव्यवहार आरोपांनंतर गोकुळ संघातील घड्याळ-जाजम खरेदी व पशुखाद्य पुरवठ्याच्या तपासाला प्रशासनाने दिली गती.
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) घड्याळ, जाजम आणि पशुखाद्याच्या चौकशीला आता गती आली आहे. साधारण महिन्याभरात याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर होणार आहे.