Gokul Dudh Sangh : उच्च न्यायालयाच्या 'या' निकालानंतर शौमिका महाडिक आक्रमक; गावोगावी जाऊन सांगणार 'ही' माहिती

हातकणंगले मतदारसंघातून शौमिका महाडिक असे चित्र गेल्यावेळच्या निवडणुकीत झाले होते.
Gokul Director Shoumika Mahadik
Gokul Director Shoumika Mahadikesakal
Updated on: 
Summary

गोकुळमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराविरुद्ध चौकशी व्हावी, यासाठी नेटाने काम करण्याची ताकद मिळाली आहे.

कोल्हापूर : आम्ही घेतलेल्या हरकती बरोबर असाव्यात, त्यामुळेच न्यायालयाने गोकुळची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सहकार कायद्यानुसार चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Gokul Director Shoumika Mahadik
Kolhapur News : सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का; गोकुळ दूध संघाची 'ही' याचिका High Court ने फेटाळली

गोकुळमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराविरुद्ध चौकशी व्हावी, यासाठी नेटाने काम करण्याची ताकद मिळाली आहे. दरम्यान, गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांत दूध उत्पादकांसाठी जो काही लढा उभारला आहे, याबाबात दोन दिवसांत गावोगावी जाऊन लोकांना माहिती सांगणार असल्याचा इशाराही शौमिका महाडिक यांनी दिला.

महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळमधील (Gokul Milk Union) पशुखाद्य वाहतूक आणि पुरवठ्यासाठी ज्यांना निविदा दिली आहे, त्याचे आगाऊ ॲडव्हान्स दिले आहे. संघाच्या वतीने ज्यांना-ज्यांना देणगी दिली आहे, त्यावर ताशेरे ओढले आहेत. निविदेशिवाय देवाण-घेवाण केली आहे. सहकारी संस्थेत निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे असते. ही प्रक्रिया करून ज्याने कमी दराने निविदा भरली आहे.

Gokul Director Shoumika Mahadik
वाद चिघळला! 'कावेरी'वरून कर्नाटकला मोठा धक्का; तामिळनाडूला रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची सूचना

त्यांना ठेका देणे महत्त्वाचे असताना जास्त किमतीची निविदा भरणाऱ्यांना ठेका दिला आहे. अनेक कामांत निविदा काढलेली नाही. वाहनांची निविदा न काढता वाहने भाडे कराराने घेतली आहेत. एकूण संघातील काही मुद्द्यांवर अनियमितता दाखवून दिली आहे. गोकुळकडून शौमिका महाडिक या सत्ताधारी संचालक आहेत. त्या बैठकीला असतात.

त्यावेळी त्या कोणताही विरोध करत नाहीत. त्यामुळे त्याही तेवढ्याच जबाबदार आहेत, असा युक्तिवाद केला होता. मात्र, संचालिका असल्या तरीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्यांची सूचना प्रोसेडिंगमध्ये घेतली जात नाही., अशी तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यामुळे न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.’ यावेळी माजी संचालक रणजितसिंह पाटील, उदय पाटील, विश्‍वास जाधव आदी उपस्थित होते.

Gokul Director Shoumika Mahadik
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

‘गोकुळ’वर प्रशासकांची मागणी नाही

‘गोकुळ’मधील गैरकारभार थांबला पाहिजे. गोकुळला सुधारण्यासाठी संधी आहे. तो कारभार सुधारला पाहिजे, ही मागणी आहे. मात्र, ‘गोकुळ’वर प्रशासक यावा, अशी कोणतीही मागणी नसल्याचेही महाडिक यांनी सांगितले. दरम्यान, हातकणंगले मतदारसंघातून शौमिका महाडिक असे चित्र गेल्यावेळच्या निवडणुकीत झाले होते. आता दोन खासदार चांगले आहेत. त्यामुळे पक्ष जो निर्णय देईल. त्यानुसार काम करत राहणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
80s Retro AI Trend Maharashtra politicians retro look shoumika mahadik muralidhar mohol
Gokul Election Row
Marathi News Esakal
www.esakal.com