कोल्हापूर : ‘हम सब एक है’चा नारा देत आज सकाळी ‘गोकुळ’मधील स्वीकृत संचालकांसह राजर्षी शाहू आघाडीच्या १९ संचालकांनी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या (Gokul Dudh Sangh) कार्यालयात शक्तिप्रदर्शन केले. ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या (Arun Dongle) बंडानंतर आघाडीतील उर्वरित संचालकांनी हातात हात घालून एकसंध असल्याचे दाखवून दिले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर आज हे शक्तिप्रदर्शन झाले.