12 Mahayuti directors absent from Gokul meeting
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीसाठी आज (ता. २९) सकाळी ११ वाजता गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प कार्यालयात सभा होत आहे. मात्र, या सभेला महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे संचालक अनुपस्थित राहिल्यास अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘गोकुळ’ची सत्ता आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे जाऊ नये, यासाठी महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.