वारणानगर : जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) अचानक वारणेत येऊन चक्क वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे (Dr. Vinay Kore) यांची भेट घेतली. यावेळी महाडिक यांनी आमदार कोरेंचाच सत्कार केला. आप्पाच्या हातातील फुलांचा बुके पाहिल्यानंतर ‘आप्पा बुके कशाला आणायचा, असा कोरेंनी सवाल करताच ‘सावकर... इथूनपुढे मला कायम बुके घेऊन यायला लागणार’ असे सन्मानाचे उत्तर मिळताच सावकरही भारावून गेले.