
कोल्हापुरात आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद द्या, अशी अवस्था आहे. इतकं महत्व गोकुळच्या संचालकपदाला आहे. आता संचालक इतका महत्वाचा असेल तर विचार करा, अध्यक्षाचा कायच रूबाब असेल. आणि याच अध्यक्षपदावरुन गोकुळचं ढवळून निघालेलं राजकारण संबंध महाराष्ट्रानंही पाहिलं. पहिल्यांदाच यात खुद्द मुख्यमंत्र्यांनीही एन्ट्री घेतली. पण, त्याच राजकारणाला आता ब्रेक लागलेला दिसतोय. कारण, १५ मे रोजी राजीनाम्याचा शब्द देऊन घुमजाव करणाऱ्या अरुण डोंगळेंनी अखेर माघार घेतली.