esakal | Gokul Election 2021 Update : पन्हाळा तालुक्यात 100 टक्के मतदान

बोलून बातमी शोधा

Gokul Election 2021 Update : पन्हाळा तालुक्यात 100 टक्के मतदान
Gokul Election 2021 Update : पन्हाळा तालुक्यात 100 टक्के मतदान
sakal_logo
By
विनोद दळवी

आपटी (कोल्हापूर) : जिल्‍हयाचे लक्ष लागून राहिलेल्‍या गोकूळ निवडणुकीसाठी आज पन्‍हाळा तालुक्‍यात दुपारी 2 वाजेपर्यत चुरशीचे 98.1 टक्‍के मतदान झाले. एकूण 353 मतदारांपैकी पुरूष 270 आणि महिला 76 अशा 346 मतदारांनी मदानाचा हक्‍क बजावला. सकाळी दोन्‍ही गटांनी मतदार आणल्‍याने 12 वाजेपर्यंतच 94 टक्‍के मतदान झाले होते.

पन्‍हाळा तालुक्‍यात सुरवातीला येथील कुमार विदयामंदिर मधील 3 खोल्‍यात मतदान होणार होते. परंतु न्‍यायालयाने मतदान केंद्रांची संख्‍या दूप्‍पट करण्‍याची सुचना केल्‍याने वाघबीळवरील फोर्ट इंटरनॅशनल या शाळेत मतदानाची सोय करण्‍यात आली. आज सकाळी सत्‍तारूढ आघाडीच्‍या मतदारांनी पांढऱ्या टोप्‍या घालून एकत्र येत मतदानाचा हकक बजावला. त्‍यानंतर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्‍या मतदारांनी पन्‍हाळ्यातून येवून मतदान केले. तत्‍पूर्वी मतदारांना मतदान कसे करायचे याचे एका हॉटेलात प्रात्‍यक्षिक करून घेण्‍यात आले.

हेही वाचा: Gokul Election 2021 Update: राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलात चुरशीने ९९ टक्के मतदान

विरोधी आघाडीच्‍या मतदारांनी पिवळ्या टोप्‍या आणि त्‍याच रंगाचा मास्‍क परिधान केला होता. मतदान केंद्राबाहेर चोख पोलिस बंदोबस्‍त असल्‍याने तसेच तहसिलदार रमेश शेंडगे उपस्थित असल्‍याने मतदान शांततेत पार पडले. दोन्‍ही गटाच्‍या मतदारांनी वेगवेगळया टोप्‍या घातल्‍याने कुणाचे मतदार किती याचा हिशोब दोन्‍ही गटाचे कार्यकर्ते करत होते. मतदान केंद्राबाहेर मतदारांपेक्षा कार्यकत्‍यांची गर्दी अधिक होती.

सत्‍तारूढ आघाडीकडून माजी अध्‍यक्ष अरूण नरके यांनी स्‍वागत केले. तर विरोधी गटाचे आमदार विनय कोरे यांनी आपल्‍या ठराविक कार्यकर्त्‍यांसह मतदान केंद्राला भेट देवून गटाचे 205 मतदार आपल्या बाजूने असल्‍याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला. माजी आमदार चंद्रदीप नरके, बाबासाहेब पाटील सरूडकर यांनीही मतदान केंद्राला भेट दिली. तसेच अंतिमत: १०० टक्के मतदान पूर्ण झाले असून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ७ ठरावधारक रुग्णांसह जिल्हाबॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुलेंकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

आरामगाड्यांची सैर

काल सायंकाळी एका गटाच्‍या मतदारांना पन्‍हाळगडावर आणण्‍यासाठी दोन आरामगाड्यांची तसेच ब-याच खाजगी गाड्यांची सोय करण्‍यात आली होती. त्‍यांच्‍या दिमतीला काही स्‍थानिक कार्यकर्तेही होते. रात्री दोन मंत्र्यांच्‍या गाड्या आपल्‍या समर्थकांसह सायरन वाजवत आल्‍याने शांत पन्‍हाळगडी ही निवडणूक आणि कोरोना प्रतिबंधाची नियमावली यावरून चर्चेला उधाण आले होते.

हेही वाचा: VIDEO: Gokul Update Live: गोकुळ दूध संघ व्यापाराच्या हातातून शेतकऱ्यांच्या हातात येईल; सतेज पाटीलांचा विश्वास