

Gokul Election Latest Updates satej patil
esakal
Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाच्या सत्तेची गणिते जुळवताना महायुतीने चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या सीमाभागातील तीन तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मतदानापूर्वी ठरावधारकांची एकजूट कायम ठेवण्यासह मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून नियोजनबद्ध रणनीती आखण्यात आली आहे. या तीन तालुक्यांतील ११०० हून अधिक ठरावधारकांपैकी ९०० हून अधिक जण दक्षिण भारताच्या सहलीवर रवाना झाल्याने गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने मतांची बांधणी कितपत भक्कम आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.