

Gokul Dairy Election 2026 Sees 12 Former Directors and 11 New Faces Three Former Presidents Contesting in Karveer
sakal
कोल्हापूर: गोकुळच्या निवडणुकीत पंचवीस पैकी बारा जागांवर माजी संचालकांना महायुतीच्या यादीत आज स्थान मिळाले. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. बंडखोरीच्या भीतीने माघारीच्या शेवटच्या दोन तासांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही यादी प्रसिद्ध केली.