Gokul Election : २५ जागांसाठी ३०१ इच्छुक एकूण ४३६ उमेदवारी अर्ज दाखल ; आज होणार छाननी

Scrutiny of Gokul Election Forms to Begin at 11 AM : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या २५ संचालक पदांसाठी ३०१ इच्छुकांनी एकूण ४३६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Gokul Election

Gokul Election

esakal

Updated on

कोल्हापूर : गोकुळच्या संचालक पदाच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुकांचे ४३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज शेवटच्या दिवशी ८२ इच्छुकांनी ११५ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी (ता. २३) सकाळी अकरा वाजता छाननी सुरू होणार आहे. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात ही छाननी होईल. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी माजी संचालक मुरलीधर जाधव यांच्यासह ८२ इच्छुकांनी ११५ उमेदवारी अर्ज दाखल केले.

कालच बहुतांशी अर्ज कालच दाखल केले आहेत. त्यामुळे आज फार गर्दी नव्हती. संपूर्ण मंडप रिकामा होता, तर पोलिसही निवांत होते. माजी संचालक बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर यांनीही आज दुबार अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांचा अर्ज शक्तिप्रदर्शनाने दाखल केला.

Gokul Election
Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

यावेळी ठाकरे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यांनी केले अर्ज दाखल आज दाखल अर्जात सुनील शिंत्रे, सुयेशा घाटगे, अभिषेक शिंपी, अरुण इंगवले, राहुल पाटील, तेजस्विनी पाटील, दत्तात्रय उगले, एकनाथ पाटील, धीरज डोंगळे, गंगाधर व्हसकोटी, रामचंद्र डांगे, उज्‍ज्वला उल्हास पाटील, स्निग्धा चेतन नरके, ज्योती दीपक पाटील, ॲड. दत्तात्रय राणे, युवराज गवळी यांचा समावेश आहे.

‘गोकुळ’चे कुरूक्षेत्र

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने रमणमळा येथे दिवसभर शांतता होती.

टप्प्याटप्प्याने होणार छाननी सकाळी पावणेअकरा वाजता बहुउद्देशीय सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना आत प्रवेश दिला जाईल. अकरा वाजता पहिल्यांदा सर्वसाधारण गटातील छाननी सुरू केली जाईल. त्यानंतर कोणी हरकत घेतली, तर त्यावर निर्णय होईल. त्यानंतर इतर गटातील छाननी होईल. अशी टप्प्याटप्प्याने छाननी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election 2026 BJP Mahayuti candidates nomination
Kolhapur Gokul Election 2026 133 candidates 205 nomination forms
Gokul Milk Union Election Vishwas Patil Files Nomination With Five Others 15 Candidates Submit 19 Forms in Kolhapur
Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com