

Gokul Election Controversy k p patil statement
esakal
Gokul Election Latest News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशीच ठरावधारकांना शपथ देण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीच्या नेत्यांकडून आदमापूर येथील बाळूमामा मंदिर परिसरात ठरावधारकांना शपथ देण्यात आली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांनी बाळूमामाची शपथ मोडल्यास मेंदूविकाराचा झटका आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे धक्कादायक विधान केले. तर खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यातील नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष असल्याचे सांगत ठरावधारकांना चुकीचे काही करू नका, अशी ताकीद दिली.