

Gokul Election Row
ESakal
कोल्हापूर, संदीप शिरगुप्पे:
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतील आणि गोकुळमध्ये महायुतीला २५, तर महाविकास आघाडीला एकही जागा मिळणार नाही, असा दावा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला. गोकुळच्या निवडणुकीतील पात्र-अपात्र ठरावधारकांचा वाद, सुरू असलेल्या भेटीगाठी आणि समविचारी आघाडीच्या हालचालींवरून त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. याचवेळी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून हा महामार्ग पूर्ण केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.