Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी
5,423 Societies Eligible to Vote : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर आणि बाळासाहेब खाडे यांनी एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले.
कोल्हापूर : जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी तिघा उमेदवारांनी एकूण चार अर्ज दाखल केले. यामध्ये माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह माजी संचालक शशिकांत पाटील चुयेकर आणि बाळासाहेब खाडे यांचा समावेश आहे.