पन्हाळ्यातील प्रकार व्हायरल; ‘गोकुळ’ मधील भांडवली गुंतवणूक चव्हाट्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्हाळ्यातील प्रकार व्हायरल; ‘गोकुळ’ मधील भांडवली गुंतवणूक चव्हाट्यावर

पन्हाळ्यातील प्रकार व्हायरल; ‘गोकुळ’ मधील भांडवली गुंतवणूक चव्हाट्यावर

पुनाळ (कोल्हापूर) : गोकुळ निवडणूक (Gokul Election)झाली. त्याचा गाजावाजाही झाला. पण या निवडणुकीमुळे ठरावधारक मालामाल होतात, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे गोकुळचा ठराव आपल्या नावे घेण्याची चढाओढ चालते. असे असताना ठरावाचे पैसे चक्क सभासदांना वाटण्याचा स्तुत्य उपक्रम पन्हाळा(Panhala)तालुक्यातील एका गावातील देवाच्या नावाने असलेल्या संस्थेत घडला.

एवढेच नव्हे तर हा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाला. या प्रकारावर सर्वस्थरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. पण या प्रकाराला वेगळं वळण लागल्याची चाहुल लागताच हा प्रकार चुकीचा असल्याचे संस्थाचालकांकडून सांगण्यात आला. तथापि यानिमित्ताने ‘गोकुळ’ च्या निवडणुकीतील भांडवली गुंतवणूक मात्र चव्हाट्यावर आली.

gokul election panhala viral message update marathi news

संबंधित संस्थेत सुमारे सत्तर सभासद असून प्रत्येकी २५०० हजार दिल्याची माहिती मिळाली. सभासदांना याबाबत विचारणा केली, असता संस्थेने आम्हाला फरकापोटी ही रक्कम दिल्याचे सांगितले. वस्तुस्थिती पाहता पैसे सभासदांना मिळाले खरे पण प्रत्येक सभासदाला समान फरक मिळणे अशक्य आहे. यावरुन एवढेच कळते की ठरावाचे पैसे ठरावधारकाने सभासदांना दिल्याचे प्रकरण आज तालुक्याबरोबर जिल्ह्यात गाजले. याबाबत वरुन दबाव आल्यानंतर हेच ठरावधारक आपण पैसेच घेतले नसुन देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगतात. काहीही असले तरी या प्रकाराची चर्चा दिवसभर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नेटधारकांच्यात उलट सुलट पोस्ट पडत होत्या.

हेही वाचा- ‘मामा, मास्क काढा, मास्क काढा साहेब; कोरोनाचा सल्ला पडला तरूणाला महागात! पोलिसी खाक्या पडताच बिल्ली म्याव

संस्थेचे म्हणणे असे

सभासदांना ठरावाचे पैसे देण्याच्या प्रकाराला वेगळे वळण लागलेले पाहता संबंधीत संस्थेच्या ठरावधारकाने संस्थेच्या नावे पत्र प्रसिद्धीसाठी दिले. पत्रातील मजकुर असा-आज दिवसभर आमच्या संस्थेविषयी व्हायरल झालेली पोष्ट पुर्णतः चुकीची आहे.आमच्या संस्थेची बदनामी करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. वस्तुतः आम्ही सध्या कसलेही पैसे वाटलेले नाहीत. हा व्हायरल फोटो दिवाळी फरक वाटलेला जुना आहे. ज्यांनी हा फोटो व पोष्ट व्हायरल केली त्याची चौकशी करुन अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.

Web Title: Gokul Election Panhala Viral Message Update Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top