

satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result
esakal
Gokul Milk Union Election : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार अशा दिग्गज नेत्यांची ताकद एका बाजूला, तर आमदार सतेज पाटील यांची रणनीती दुसऱ्या बाजूला, अशा अटीतटीच्या लढतीत सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील यांच्या समविचारी आघाडीने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीचा निकाल अखेर सतेज पाटील यांच्या बाजूने लागला. ठरावधारकांनी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमताचा कौल देत महायुतीला मोठा धक्का दिला. समविचारी आघाडीने १६ जागांवर विजय मिळविला, तर महायुतीला नऊ जागांवर समाधान मानावे लागले.