

Gokul Election Mahayuti Seat Sharing Dispute Deepens As NCP Gets Another Seat And Fight Erupts Over Yadravkar Group
sakal
कोल्हापूर: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला आणखी एक जागा हवी असल्याने या जागेवरून उमेदवार निश्चितीचा तिढा निर्माण झाला आहे. त्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे; पण याला राष्ट्रवादीतूनच अंतर्गत विरोध आहे.