esakal | 'गोकुळ'चे रणांगण : निकालाचे आडाखे बांधण्यास सुरूवात; कार्यकर्ते लागले कामाला
sakal

बोलून बातमी शोधा

'गोकुळ'चे रणांगण : निकालाचे आडाखे बांधण्यास सुरूवात; कार्यकर्ते लागले कामाला

'गोकुळ'चे रणांगण : निकालाचे आडाखे बांधण्यास सुरूवात; कार्यकर्ते लागले कामाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे आज मतदान संपल्यानंतर तालुकानिहाय आलेल्या आकडेवारीवरून निकालाचे आडाखे बांधण्यात दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते गुंतले आहेत. तालुक्‍यात मतदान किती होते, प्रत्यक्षात झाले की आणि आपल्याला यापैकी किती मिळणार अशी गणिते मांडण्यास सुरूवात झाली आहे.

'गोकुळ' च्या निवडणुकीसाठी आज चुरशीने 99.78 टक्के मतदान झाले. मर्यादित मतदार आणि त्यांच्या मागे असलेली नेत्यांची फौज यामुळे निकालाचा अंदाज बांधणे मुश्‍किल आहे. दोन्ही आघाड्यांनी विजयाचा दावा केला असला तरी 'गोकुळ' च्या आजपर्यंतच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील या ठरावदारांनी नेहमीच चकवा दिला आहे. पाच वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीत याची झलक पहायला मिळाली होती.

हेही वाचा: Gokul Election 2021 : 'आमचं गोकुळ चांगलं चाललयं', हातकणंगलेत चुरशीचे मतदान

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी दिग्गज नेते एकमेकांसमोर ठाकल्याने मोठी चुरस आहे. त्यामुळेच निकालाविषयी प्रचंड उत्सुकता जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्रात आहे. आज सायंकाळी पाच वाजता मतदान संपले. तालुकानिहाय झालेल्या मतांची आकडेवारी एकत्र करून दोन्ही आघाड्यांनी आपली गणिते मांडण्यास सुरूवात केली आहे. यात सर्वाधिक धोका हा 'क्रास' मतदानाचा आहे, असे मतदान होणारे तालुके आणि उमेदवार कोण हेही या कार्यकर्त्यांना माहित आहे. अशी मते वेगळी करून आपल्या उमेदवाराला किती पडतील, पॅनेल कोणाचे बसेल याचे आडाखे या कार्यकर्त्यांकडून बांधले जात आहेत.

पाच वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीत संघाच्या विद्यमान अध्यक्षांनाच मतदारांनी घरी बसवले होते तर विरोधी आघाडीला दोन जागांवर विजय मिळवता आला होता. त्यावेळी विरोधी आघाडीचे सामान्य उमेदवार, पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोजक्‍या नेत्यांसह दिलेली लढत हा विषय होता. यावेळी जिल्ह्यातील अपवाद वगळता झाडून सगळे नेते सत्तारूढ गटाच्या विरोधात एकत्र आल्याने या निकालाचा अंदाजही बांधणे मुश्‍किल असल्याचे आडाखे बांधणाऱ्या कार्यकर्त्यांचे मत आहे.

हेही वाचा: Gokul Election: आराम गाडीतून मतदारांचे 'ऐटित' मतदान; राधानगरीत मुश्रीफ, मंडलिकांना जबरदस्त प्रतिसाद

loading image